Press "Enter" to skip to content

गडकिल्यांचे संवर्धन व रक्षण करायला हवे : शिवव्याख्याते चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन !

  • खारघरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा !
  • मराठा समाज खारघर संस्थेचे आयोजन !
  • पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : मराठा समाज खारघर संस्थेच्या वतीने खारघर येथे सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. खारघर सेक्टर १२ येथील उत्कर्षा हॉलमध्ये संपन्न झालेल्या शिवजयंती महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून सकाळी मानवंदना देण्यात आली. दुपारी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिलांचा सन्मान करण्यात आला. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य गेलं कुठे ? विषयावर शिवव्याख्याते चंद्रकांत पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मराठा समाज खारघर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी ए पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती महोत्सव संपन्न झाला.

छत्रपती शिवरायांचा इतिहास अनेकांनी आपापल्या परीने सांगितला, अनेक ठिकाणी तो चुकीचा मांडण्याचा प्रयत्न झाला, हे देशाच्या ऐतिहासिक वारसासाठी धोकादायक असल्याचे रोखठोक प्रतिपादन शिवव्याख्याते चंद्रकांत पाटील यांनी खारघर येथे केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य गेलं कुठे ? या विषयावर ते बोलत होते. समाजाने शिवरायांचा खरा इतिहास जाणून घेण्याची गरज असल्याचे श्री पाटील यांनी यावेळी नमूद केले. शिवरायांनी बांधलेले गडकिल्ले हि आपली ऐतिहासिक संपत्ती आहे, तिचे सर्वर्धन व रक्षण करायला हवे, हि शासनाची आणि आपली नैतिक जबाबदारी आहे. गडकिल्ल्यांचा हाच ऐतिहासिक ठेवा उद्याच्या पिढीला शौर्याचे धडे देईल, असे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या माजी सभापती तथा नगरसेविका लीना गरड, खान्देश मंडळाचे अध्यक्ष मधू पाटील, पोलीस अधिकारी अर्जुन गरड, भाजपचे वैधकीय सेलचे अध्यक्ष किरण पाटील, राष्ट्रवादी खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम, राष्ट्रवादी उपाध्यक्ष योगेश निपाणे, काँग्रेसचे खारघर अध्यक्ष कमांडर कलावत, भाजप खारघर तळोजा मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, प्राचार्य मिलिंद ठोकळे, राष्ट्रवादीचे खारघर अध्यक्ष बळीराम नेटके, राष्ट्रवादीच्या पनवेल जिल्हा महिला सचिव नेहा पाटील, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्याध्यक्ष कालिदास देशमुख, सचिव प्रतापराव पाटील, उपाध्यक्ष संजय कंधारे, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, उपाध्यक्ष अशोक गिरमकर, उपाध्यक्षा अलका कदम, खजिनदार ज्ञानदेव नवले, सहसचिव वृषाली शेडगे, सहखजिनदार तानाजी जाधव तसेच विश्वासराव घार्गे, दिलीप महाडिक, राजाराम वायचळ, शांताराम सुर्वे, डी वाय पाटील, मनोहर सत्रे, राजेंद्र कदम, सुनीता काळे, माधव शिंदे आदी सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया मोहिते यांनी केले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »