Press "Enter" to skip to content

जनसंख्या वृद्धीतून भविष्यात उद्भवणार धोके : भारत रक्षा मंच !


पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : जनसंख्या वृद्धी, त्यातून उद्भवणारे भविष्यातील धोके आणि त्यावर भारत रक्षा मंचाची भूमिका या विषयावर आज येथे भारत रक्षा मंचाच्या वतीने पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला भारत रक्षा मंचाचे संस्थापक व राष्ट्रीय संघटन मंत्री सूर्यकांत केळकर, राष्ट्रीय सह संघटन मंत्री प्रशांत कोतवाल व महिला मंचाच्या राष्ट्रीय अध्यक्षा  बीना जयेश गोगरी यांची उपस्थिति होती. 

सूर्यकांत केळकरांनी बोलताना सांगितले की, बांगलादेशी घुसखोरी विरुद्ध भारत रक्षा मंचाने काम सुरू केले. आसाम मध्ये NRC (National Register of Citizens) च्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करून सरकारने NRC ची प्रकिया संपूर्ण देशात लागू करावी आणि घुसखोरांना एकत्र देशातून बाहेर काढून टाकावे किंवा जर ते कामगार म्हणूनच आले असतील तर WORK PERMIT देऊन अशा घुसखोरांना सरकारी परवाना घेऊन देशात राहण्याची अनुमती द्यावी. रोहिंग्या घुसखोरांवर प्रश्नाला उत्तर देताना श्री. केळकरांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले की जे मुसलमान असून बांगलादेशने देखील त्यांना थारा नाही दिला तर भारताने का त्यांना सामावून घ्यावे? असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला की आपल्या देशाला अंतर्गत लोकसंख्येची समस्याच कमी आहे का की आणखीन कुणाला आपण देशात घ्यावे? 

       CAA (नागरिकांत संशोधन कायदा) द्वारे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातून भारतात अवैधपणे आलेल्या तेथील अल्पसंख्यानकांना म्हणजेच गैर मुसलमानांना नागरिकता देण्याचे प्रावधान केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन देखील केले आणि भारत रक्षा मंचाची ही मागणी मान्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

    वाढत्या जनसंख्येमुळे एक प्रकारे भविष्यात संसाधनांच्या तुटवड्यामुळे गृहयुद्धाची स्थिती उपस्थित होऊ शकते. यात देखील मुसलमान वगळता इतर सर्व समाजांत परिवार नियोजनाचे प्रयत्न देशात गेली अनेक वर्षे दिसून आलेच आहे. श्री. केळकर म्हणाले की त्यांच्याकडून केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे की भाषा, प्रांत, जाती धर्म असले रंग न देता समानतेने एक कडक जनसंख्या नियंत्रण कायदा देशभरात त्वरीत लागू व्हावा, असेही केळकर यांनी यावेळी सांगितले. 

        जनसंख्या नियंत्रण कायदा सरकारने आणावा याकरीता भारत रक्षा मंचाच्या देशभरातील प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीने त्या त्या जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्र सरकारला तसे निवेदन देखील देण्यास सुरुवात केली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश जनसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणिकरिता पोस्ट कार्ड अभियान सुरू करेल असे मंचाच्या महिला मंच राष्ट्रीय अध्यक्षा बीना गोगरी यांनी सांगितले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »