Press "Enter" to skip to content

भारती विद्यापीठ आयएमएसआर आयोजित ७ दिवसीय कार्यशाळा संपन्न !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : “रिसर्च पब्लिकेशन अँड अनालिटिकस ” या विषयावर भारती विद्यापीठ , नवी मुंबई येथे नुकतीच ७ दिवसीय कार्यशाळे चे आयोजन करण्यात आले होते.

ही कार्यशाळा भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् अँड रिसर्च,नवी मुंबई, गुरुनानक इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, नवी दिल्ली आणि सेंट झेविअर्स पी जी कॉलेज, हैदराबाद ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

या प्रसंगी भारती विद्यापीठ नवी मुंबई कॉम्प्लेक्स चे प्रादेशिक संचालक डॉ. विलासराव कदम , बी व्ही आय एम एस आर, नवी मुंबई च्या संचालक डॉ. अंजली कळसे, गुरुनानक इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, नवी दिल्ली च्या संचालक डॉ.मणिंदर कौर आणि सेंट झेविअर्स पी जी कॉलेज, हैदराबाद चे प्राचार्य डॉ. शिवरात्री चंद्रमाऊली यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेत सहभागी झालेल्या समस्त प्राध्यापक,संशोधक आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

ह्या कार्यशाळेत प्रा.अनुजकुमार (बी व्ही आय एम एस आर, नवी मुंबई), डॉ. निशु आईडी (बी व्ही आय एम आर, नवी दिल्ली),तसेच प्रा.जो.हॉटन(संचालक- प्रोजेक्ट मॅनेजमेंट,युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ डब्लीन, आयर्लंड) यांच्या सारख्या अनुभवी संशोधकांनी विचार व्यक्त केले . विशेष म्हणजे प्रा.अनुजकुमार ह्यांनी या प्रसंगी रिसर्च पब्लिकेशन ह्या विषयावरअतिशय सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करून सर्वाची मने जिंकली.

कार्यशाळा आयोजन करण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल डॉ. विलासराव कदम, डॉ.अंजली कळसे, डॉ. मणिंदर कौर,डॉ. शिवरात्री चंद्रमाऊली ह्यांचे विशेष आभार कार्यशाळा-समन्वयकद्वय प्रा.कुलदीप भालेराव व डॉ. असमत आरा शेख ह्यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीते साठी अनेक प्राध्यापक,संशोधक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »