नवी मुंबईच्या राजकारणात धडाकेबाज एंट्री करून आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणारे नवी मुंबई भाजपचे युवा नेतृत्व म्हणजे दारावे गावाचे भूमिपुत्र रणजित नाईक होय. रणजित नाईक हे लोकनेते गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक आहेत. नवी मुंबईत महानगरपालिकेच्या सिवुड्स- दारावे विभागात रणजित नाईक यांचे मोठे कार्य आहे.
रणजित नाईक भाजपाचा एक युवा कार्यकर्ता , मात्र त्यांची पक्षाच्याप्रति असलेली निष्ठा आणि कार्यशैलीमुळे त्यांच्यावर नवी मुंबई भाजप युवा मोर्चा सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. एक सामान्य कार्यकर्ता तेव्हाच एक नेता म्हणून नावारूपास येतो जेव्हा तो आपल्या कार्यकर्तृत्वाने छाप पाडतो. समाजमनात, जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करतो. रणजित नाईक यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरुळ विभागात आणि विशेषतः सिवूडस-दारावे प्रभाग क्रमांक ९२ आणि ९९ मध्ये रणजित नाईक यांचे उत्तम कार्य आहे. सिवूडस-दारावे विभागात आमचा नेता अशी प्रतिमा जनतेच्या मनात त्यांनी निर्माण केलीय. दारावे गावातील ग्रामस्थांनी देखील रणजित नाईक यांच्या नेतृत्वाचे स्वागत केले आहे. सिवूडस -दारावे विभागातील नागरी प्रश्नांची रणजित नाईक यांना चांगली जाण आहे. रस्ते, पदपथ, गटारे, दिवाबत्तीची सोय, साफसफाई, आदी विविध नागरिकामांसाठी रणजित नाईक यांनी सदैव प्राथमिकतेने काय केले आहे. त्यांच्या कार्यात सातत्य आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकांची कामे झाली पाहिजेत, अशी त्यांची नेहमी भूमिका असते. आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर राबवून आपले सामाजिक दायित्व रणजित नाईक यांनी निभावले आहे.
आपला नेता कसा आहे याची खरी जाण लोकांना संकटाच्या काळात होते. कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकटात किंबवना लोकांना ते कळून चुकले. कोरोना सारख्या जीवघेण्या संसर्ग रोगाला न भीता ,स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात रस्त्यावर उतरून लोकांची सेवा केली. लोकांच्या मदतीला धावून गेले. अन्नधान्य, जेवण, हॅन्ड वॉश, सनीटाईझर, मास्क वाटप करून मानवी मूल्याची जपणूक केली. अनेकांना आर्थिक मदत केली. आपल्या विभागातील नागरिकांना वैदयकीय सुविधा मिळावी,म्हणून सदैव धावून गेले. कोरोनाच्या संकटकाळी प्रभाग क्रमांक ९२ आणि प्रभाग क्रमांक ९९ मध्ये विशेषत्वाने कार्य केल्याचे दिसते. त्यामुळे येथील नागरिकांचा मोठा ताफा त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे. युवकांची मोठी फळी रणजित नाईक यांच्यासोबत आहे. हीच ताकद त्यांना येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयश्रीकडे नेईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते.
एक खंबीर नेतृत्व उभे राहायला त्या व्यक्तीकडे जिद्द,धडपड, चिकाटी, आणि संयम लागतो. रणजित नाईक हे लोकनेते गणेश नाईक यांच्या तालमीत तयार झाल्याने लोकांचे नेतृत्व करायला ते खऱ्या अर्थाने तयार आहेत. त्यांचे कार्य आणि कर्तृत्व त्यांना आगामी काळात नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात पोहचवले, अशा शब्दात येथील नागरिकांनी रणजित नाईक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संकलन : संजना महाडिक.





