नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : संपूर्ण राज्यात वाढीव वीज बिलांना जनतेचा विरोध होत आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेच्या मानेवर भरमसाठ वीज बिलांचा बोजा सरकारने का दिला आहे , सरकार याबाबत ठोस निर्णय का घेत नाही, असा संतप्त सवाल माजी नगरसेविका स्वाती गुरखे यांनी केला आहे.
वाढीव विजबिल विरोधात संपूर्ण महाराष्ट्र तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. जनता रस्त्यावर उतरून निषेध आंदोलने करीत आहे. सीबीडी बेलापूर येथे पुन्हा आंदोलन करण्यात आले.वीज कंपनीने पाठवलेली वाढीव वीज बिले कमी करावीत अशी मागणी माजी नगरसेवक अशोक गुरखे यांनी यावेळी केली. इतक्या मोठया प्रमाणात नागरिकांमधून विरोध होत असूनही कोणताही निर्णय सरकार घेत नाही.सरकारने नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, अशी तीव्र भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सीबीडी बेलापूर तसेच प्रभाग क्रमांक १०२ मधील अनेक रहिवाशी आंदोलनात सहभागी झाले होते.
कोकण दर्पण.





