लोकनेेते गणेश नाईक यांच्या हस्ते भूमीपूजन ! नेरूळच्या धोकादायक दत्तगुरू सोसायटीतील सदस्यांचे स्वप्न पूर्ण !
नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : गेले सहा ते सात वर्ष धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नेरूळ सेक्टर 6 येथील दत्तगुरू सहकारी सोसायटीतील रहिवाशांचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असून अडीच एफ.एस.आय.च्या माध्यमातून नवी मुंबईतील या पहिल्या सोसायटीच्या पुनर्बांधणीचा षुभारंभ लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते शुक्रवारी पार पडला.
या सोसायटीची पुनर्बांधणी होण्यासाठी सोसायटीचे प्रमुख मार्गदर्षक तथा माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी आतोनात प्रयत्न केेले आहेत. नवी मुंबई पालिकेत अविरत पाठपुरावा त्यासाठी केला आहे. कधी सनदशीर मार्गाने तर कधी गरज भासलीच तर आक्रमकपणे सोसायटीमधील रहिवाशांना पुनर्बांधणीतून पक्की आणि सुरक्षित घरे मिळण्यासाठी ठाम भुमिका घेतली आहे.
केरोनाची खबरदारी घेवून पार पडलेल्या या कार्यक्रमास माजी खासदार डाॅ.संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे, गिरीश म्हात्रे, विशाल डोळस, सुजाता पाटील, जयश्री ठाकुर, स्नेहा पालकर, माजी परिवहन सभापती प्रदीप गवस, प्रभाग समिती सदस्य सुदत्त दिवे, समाजसेवक गणेश भगत, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र बागल, सचिव राजकुमार पाटील, खजिनदार तानाजी पाटील, उपाध्यक्ष राजकुमार पुरी, सहसचिव विष्णू बोरकर,संचालक प्रकाश जाधव,हनुमंत भोसले,विक्रम अहेर, यशवंत तोरस्कर, संभाजी गायकवाड,मोहन इंदलकर,दीपाली मते,सुमन सावंत,तुकाराम माने आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफ.एस.आय. मंजूर केेला होता असे नमूद करून लोकनेते आ. नाईक यांनी सोसायटी पुनर्बांधणीचा प्रष्न निकाली लागल्याने दत्तगुरू सोसायटीमधील रहिवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्यालाही आनंद होतो, अशा भावना व्यक्त केल्या. माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी सोसायटी पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.
अधिकचा एफएसआय मिळाला तर आनंदच
धोकादायक इमारती पुनर्विंकासाकरीता चार एफएसआयची मागणी होवू लागल्याबददल पत्रकारांनी विचारले असता रहिवाशांना जास्तीत जास्त एफएसआय मिळाला तर आनंदच आहे. नगरविकास खात्याच्या नियमानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळा एफएसआय दिला जातो.
पंतप्रधान आवास योजना व्हायलाच पाहिजे
सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारी पंतप्रधान आवास योजना व्हायलाच हवी. परंतु सार्वजनिक सुविधांच्या जागांवर ती राबवून दाटीवाटी करण्यापेक्षा जेथे विस्तीर्ण जागा उपलब्ध आहे त्या नैना सारख्या क्षेत्रात ती नियोजनपूर्वक राबवावी, या मताचा लोकनेेते आ. गणेष नाईक यांनी पुनरूच्चाार केला आहे.
दत्तगुरू सोसायटीची पुनर्बांधणी होणार असल्याचे रहिवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी देखील समाधानी आहे. पुनर्बांधणीकरीता लोकनेते आ. गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गेले सात वर्षे पाठपुरावा सुरू होता. अडीच एफएसआयच्या माध्यमातून नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ दत्तगुरूपासून होत आहे.
-सुरज पाटील, माजी नगरसेवक
गेले सात वर्षे सोसायटीच्या पुनर्बांधणीसाठी आमचा लढा सुरू होता. नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते आ. गणेश नाईक यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला आहे. दत्तगुरूमधील सर्व सदस्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. – राजेंद्र बागल, अध्यक्ष दत्तगुरू सोसायटी
कोकण दर्पण





