Press "Enter" to skip to content

भारती विद्यापीठ,एन आय पी एम, कोंकण ज्ञानपीठ आयोजित कार्यशाळा संपन्न !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : ह्यूमन कॅपिटल क्लब ,भारती विद्यापीठ व्यवस्थापण आणि संशोधन महाविद्यालय नवी मुंबई, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट, रायगड आणि कोंकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य आणि कला महाविद्यालय,उरण ह्यांच्या संयुक्त विद्यमाने “कार्यक्षमता- एक काळजी गरज ” या विषयावर कार्यशाळा आयोजित केली. एन आय पी एम, रायगड अध्यक्ष अविनाश सोमवंशी आणि कोंकण ज्ञानपीठ प्राचार्य किशोर शामा यांनी प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमास डॉ. सजीव नायर- मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक, कार्यक्षम मानव संसाधन आणि नील रमेश- कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक,ए बी एल इ, मुंबई हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले. दोन्ही वक्त्यांनी कामगारांच्या कार्यक्षमतेचे महत्व आणि त्याचे मूल्यमापन ह्या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. अंजली कळसे- संचालिका, बी व्ही आय एम एस आर, आणि प्रमुख आयोजक ह्यांनी डॉ. विलासराव कदम,संचालक, भारती विद्यापीठ, नवी मुंबई परिसर, प्रा. किशोर शामा, अविनाश सोमवंशी, प्रा. कुलदीप भालेराव,डॉ.पराग करुळकर,समीर शेख,ह्यूमन कॅपिटल क्लबचे विद्यार्थी राजेश्वरी पुहान, फातिमा कादरी तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »