Press "Enter" to skip to content

तळोजा पाणी प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचा जनता दरबादर !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : तळोजा विभागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नुकताच पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पाचनंदनगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्या वतीने तळोजा येथे जनता दरबार घेण्यात आला.
तळोजा मधील पाणी प्रश्ना व नागरी मूलभूत सुविधा बाबत पंचशील सोसायटीच्या समोर नागरिक व थेट जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतिश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहराचे निर्वाचित अध्यक्ष श्री बळीराम नेटके, पाचनंदनगर संघाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते समाजसेवक कासमभाई मुलानी आदी उपस्थित होते.

यावेळी कसं मुलांनी यांनी अनेक कामाची माहिती देऊन प्रलंबित कामाबाबत तसेच तळोजा फेज १ मधील सेक्टर 2 येथील नागरिकांना पाणी पुरवठा कमी दाबाने होत असले पुरवठा बाबत व अन्य समस्या निदर्शनास आणून दिल्या. प्रामुख्याने नागरिकांना टँकर मुक्त करणे , मुंबलक पाणी पुरवठा, बँद असलेल्या स्ट्रीट लाईट, पोस्ट ऑफिस, कायमस्वरूपी पोलीस ठाणे, सरकारी रुग्णालय, , ओपन प्लॉट वरील साफसफाई, सुंदर रस्ते, सुसज्य उद्यान ,खेळाचे मैदान, विरुगुला केंद्र ,चांगले पदपथ, आरोग्य सेवा , आधार सेंटरची निर्मिती तळोजा मध्ये होत असलेले रासायनिक प्रदूषण इ अनेक प्रश्नांबाबत लक्ष वेधले. नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्या टँकरमुक्त करून मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले जातील तसेच अन्य सर्व प्रश्नाबाबत सिडको व पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा देण्यात येईलअसे आश्वासन सतीश पाटील यांनी यावेळी दिले. समाजसेवक कासमभाई मुलानी यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थित सर्व रहिवाशांचे आभार मानले. अशोक नागोटकर, महेशकुमार राऊत तसेच पंचशील रहिवाशी सोसायटी चेअरमन रितेश शेट्टी, सेक्रेटरी महाडिक,पाचनद नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी कमल प्रसाद, कुंडलिक नेटके, अतुल पवार, बशीर भाई, शर्माजी ,ओझा जी,कमल आनंदजी, गणेशनजी इ अनेक सोसायटीचे अद्यक्ष ,सेक्रेटरी, सन्मानीय सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर जनता दरबार यशस्वी करण्यासाठी आनंदजी व रितेश शेट्टी यांनी अथक परिश्रम घेतले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »