Press "Enter" to skip to content

श्री गुरुगोविंद सिंगघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड ची विद्यार्थिनी प्रतीक्षा वाघमारे बनली पोलीस शिपाई !

श्री गुरुगोविंद सिंगघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड ची विद्यार्थिनी प्रतीक्षा वाघमारे बनली पोलीस शिपाई. !

कुंडलवाडी पासून जवळ असलेल्या चिरली येथील शेतकरी लालू वाघमारे यांची मुलगी प्रतीक्षा वाघमारे ची रत्नागिरी पोलीस शिपाई पदी निवड झाली . तिचे प्राथमिक शिक्षण चिरली येथील जिल्हा परिषद शाळेत झाले त्यानंतर माध्यमिक शिक्षण कुंडलवाडी येथे तर माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर तिने उच्च माध्यमिक शिक्षणासाठी उमरी येथील नूतन महाविद्यालयातून शिक्षण घेतले आणि त्यानंतर श्री गुरुगोविंद सिंगघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड मध्ये बीजे (एम एस) पदवी करत तिने पोलीस भरतीसाठी मैदानी प्रशिक्षण घेत लेखी ,तोंडी परीक्षेची तयारी केली . या बद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विकास कदम सरांनी अभिनंदन केले , तसेच कॉलेजचे प्रा. अमोल धुळे आणि प्रा. संजय नरवाडे यांनी पेडे वाटुन कौतुक केले .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »