Press "Enter" to skip to content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी मिरवणूक दरम्यान खारघरमध्ये विद्युत दिवे बंद ! नागरिकांमध्ये तीव्र नाराजी ! संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी : निलेश बाविस्कर यांची मागणी !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी मिरवणूक दरम्यान खारघरमध्ये विद्युत दिवे बंद ! नागरिकांमध्ये तीव्र नाराजी !
संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी : निलेश बाविस्कर यांची मागणी !

पनवेल, प्रतिनिधी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी खारघर परिसरातील अनेक विद्युत दिवे बंद असल्याने नागरिकांनी पनवेल मनपा प्रशासन, सिडको प्रशासन आणि विज प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामानवाच्या जयंती दिवशी असे बेजबाबदार वर्तन करून बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्सहात साजरा केली जात असताना 14 एप्रिल रोजी सर्वत्र भव्य मिरवणूका काढल्या जातात. प्रशासनाला याबाबत माहिती असताना खारघर मधील अनेक रस्ते अंधारात होते. खारघर से 15 मधील पथदिवे बंद असल्याने मिरवणूक काढताना मोठी गैरसोय झाली. संबंधित प्रशासनातील अशा बेजबाबदारपणामुळे उत्सव आणि उत्सहात विरजन टाकण्याचा प्रकार घडला. याबाबत नागरिकांनी सदर बाबीची निंदा केली आहे. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त प्रशासन पूर्व तयारी करायला विसरले का? असा सवाल नागरिकांनी केलाय. दरम्यान, स्थानिक नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी याबाबत पालिकेकडे लेखी तक्रार करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.