Press "Enter" to skip to content

खारघर भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी !

खारघर भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी !

पनवेल, प्रतिनिधी : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांची कर्नाटकात मोठी रॅली होती. १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे ही रॅली मध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव एकच कसे? सर्व चोरांची आडनावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.
राहुल गांधी यांच्या या विधानामुळे मोदी समुदायाचा अपमान झाला आहे. या विरोधात सुरत न्यायालयाने त्यांना भादंवि कलम ५०४ अन्वये दोषी ठरवून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली.
“अश्या बेताल वक्तव्यामुळे राहुल गांधी यांचा खारघर भाजपने निषेध केला आहे.अनुदगार काढणाऱ्या राहुल गांधींचा आज खारघरमधील भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्च्याच्या वतीने धिक्कार करण्यात आला.
यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले असून,यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी खारघर भाजप मंडलाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, ओबीसी मोर्च्याचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, मा. नगरसेवक अभिमन्यूशेठ पाटील, नगरसेवक प्रवीण पाटिल, नगरसेवक ऍड. नरेश ठाकुर, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष संजय घरत, उपाध्यक्षा बिना गोगरी, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय,उत्तर भारतीय मोर्चा संयोजक विनोद ठाकुर, शिक्षक सेल चे संयोजक प्रो. संदीप रेड्डी, प्रभाकर बांगर, पप्पु खामकर, सुस्मित डोलस,क्षमा राव, प्रवीण बेरा, योगेश पाटिल इत्यादी उपस्थित होते.