Press "Enter" to skip to content

शाळा, मेट्रो स्टेशन परिसरात गर्दूल्यांचा वावर ! कायदेशीर कारवाई करावी : नगरसेविका नेत्रा पाटील यांची पोलीस व पालिका प्रशासनाकडे मागणी !

शाळा, मेट्रो स्टेशन परिसरात गर्दूल्यांचा वावर ! कायदेशीर कारवाई करावी : नगरसेविका नेत्रा पाटील यांची पोलीस व पालिका प्रशासनाकडे मागणी !

पनवेल : रामशेठ ठाकूर शाळा, विश्वज्योत शाळा व सेंट्रल पार्क शाळेच्याजवळ असलेली पान टपरी त्वरित बंद करणेत यावी, अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी प्रभाग अधिकारी अ प्रभाग समिती खारघर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक खारघर पोलीस स्टेशन यांच्याकडे केली आहे.
मा. नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी खारघर शहरातील त्यांच्या प्रभागातील सेक्टर 19 मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल समोरील कॉर्नर जवळ प्लॉट नंबर 55 सेक्टर 20 येथे व्हाईट हाऊस नावाचे एक गेस्ट हाऊस आहे त्याठिकाणी एक पान टपरी असून त्या पान टपरीतून मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी हे गुटखा,पान तंबाखू व सिगरेट अशा पदार्थांचे सेवन करताना आढळतात. सदर ठिकाणी सिगारेट व इतर धुम्रपान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रात्रीचे तरुण-तरुणी जमतात त्यांनी केलेल्या धूम्रपानामुळे व नशेमुळे ते बेभान होऊन अश्लील चाळे करतात परिसरातील रहिवाशांना सदर ठिकाणी राहणे मुश्किल झाले आहे. त्या ठिकाणी निर्लज्जपणाचा कळस हे तरुण-तरुणी करतांना दिसून येतात. यामुळे बाजूलाच असणाऱ्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बालमनावर काय परिणाम होतील याची कल्पना न केलेलीच बरी., नेत्रा पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
सदर ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत तरुण-तरुणी धूम्रपान व नशा करण्यासाठी येत असल्याची तक्रार त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांनी खारघर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी एनसीआर दाखल करून केलेली आहे. माझ्याकडे देखील अशा प्रकारची तक्रार करण्यात आलेल्या आहेत नशा केल्यानंतर त्यांचे मानसिक संतुलन सुटत असून ते त्या ठिकाणी अश्लील चाळे करणे, मोठ्या प्रमाणात कर्ण -कर्कश आवाज करणे, धूम स्टाईल बाईक (मोटरसायकल) चालवणे असे प्रकार करत असतात. सदर पान टपरी ही त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा भविष्यात दुर्घटना झाल्यास त्यास पूर्णतः सदर व्यावसायिक जबाबदार राहील याची नोंद प्रशासनाने घ्यावी. सदर पान टपरी बंद न झाल्यास रहिवाशांसोबत आंदोलन करावे लागेल याची आपण नोंद घ्यावी, अशी ठाम भूमिका नेत्रा पाटील यांनी मांडली.