Press "Enter" to skip to content

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने अग्नि सुरक्षा शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने अग्नि सुरक्षा शिबिराचे आयोजन

पनवेल : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या ( 4मार्च ते 10 मार्च) निमित्ताने आज कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने “अग्नि सुरक्षा(Fire safety)” ह्या विषयावर मार्गदर्शन शिबीर रामदेव आर्केड सोसायटी येथे आयोजित केले होते.

ह्या शिबिरामधे सुरक्षा तज्ञांनी उपस्थितांना अग्नि सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.श्री. संदिप इथापे ( मुंबई महापालिका फायर ब्रिगेड सेवा) अणि श्री. जगदीश आपटे (सेफ्टी प्रोफेशनल) ह्यांनी सर्व उपस्थितांना सुरक्षेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. घरगुती अग्नि प्रतिबंधक उपाययोजनांपासून ते गृहनिर्माण संस्थांनी करायच्या फायर ऑडिट ह्या सारख्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शिबिरामधे आगीचे विविध प्रकार अणि आग विझवण्याच्या विविध पद्धती याबाबत माहिती देण्यात आली. उपस्थितांना अग्नि सुरक्षे बाबत प्रात्यक्षिके सादर करण्यात आली तसेच उपस्थित नागरिकांनी प्रात्यक्षिकांमधे उस्फूर्त सहभाग नोंदवला. कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने भविष्यात सुद्धा कामोठे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थामधे अग्नि सुरक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्याचे नियोजन आहे.

ह्यावेळी कॉलोनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, महिला अध्यक्षा जयश्री झा, रामदेव आर्केड सोसायटी चे पदाधिकारी, रंजना सडोलीकर, अरुणा सावंत, सुजाता बत्तीन, निर्मला अरोरा, कॉलोनी फोरमचे समन्वयक बापु साळुंखे, राहुल बुधे, राघव गट्टेवार, संदिप लबडे, दिलीप पाल, सुनिल कर्पे, प्रविण भालतडक, संतोष अलदर उपस्थित होते.