खारघर येथे ऑरीकल ENT हॉस्पिटलचे उदघाट्न संपन्न !
पनवेल, प्रतिनिधी : कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुजाता गवई आणि डॉ. अपुर्व गवई यांच्या खारघर येथील ऑरीकल ENT हॉस्पिटलचे उदघाट्न नुकतेच संपन्न झाले. जे जे हॉस्पिटल मुंबई येथील सेवानिवृत्त नर्स तथा डॉ अपुर्व गवई यांच्या मातोश्री अनुपमा गवई यांच्या शुभहस्ते हॉस्पिटलचे उदघाट्न करण्यात आले. खारघर सेक्टर 13 येथील पॅसीफिक इमारतीत तिसऱ्या मजल्यावर डॉक्टर असलेल्या गवई दामत्यांनी सुरु केलेले ऑरीकल ENT हॉस्पिटल हे खारघर मधील पहिले सुसज्ज ENT हॉस्पिटल आहे. इथे एकाच ठिकाणी वैद्यकीय सेवा, उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका डॉ सुजाता गवई यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली.
हॉस्पिटलच्या उदघाट्न प्रसंगी डॉ जनार्दन आणि डॉ कांचन जनार्दन, डॉ प्रकाश झोडपे, डॉ राजेंद्र वाघेला, डॉ पूनम काठे, डॉ मणियार, डॉ सारंग गायकवाड, डॉ सीमा आवाढ, डॉ चारुदत्त वैत्ती, डॉ सखाराम गारळे, डॉ सुरेश मेनन, डॉ एस व्ही कुलकर्णी, डॉ चित्रा कुलकर्णी, डॉ सतीश शहाणे, डॉ पियुष सिंघानिया, डॉ सुमित यादव, डॉ बिरूदेव गोरड, तुषार दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.






