Press "Enter" to skip to content

नवी मुंबईत लोकलचा अपघात !

नवी मुंबईत लोकलचा अपघात

नवी मुंबई :- नवी मुंबई भागातील नेरुळ-खारकोपर भागात रेल्वेचा अपघात झाला आहे. मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलचा मंगळवारी सकाळी ८:४६ च्या सुमारास अपघात घडल्याचे समोर आले आहे. या अपघातासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार नेरुळ येथून खारकोपरला जाणारी लोकल रुळावरून घसरल्याने अपघात झाला. मंगळवारी सकाळी चाकरमानी आपल्या कामाला जात असताना अचानक सकाळी 9 च्या सुमारास खारकोपर येथे हार्बर लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे हार्बर लाईनवरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मात्र सध्या रेल्वेचे अधिकारी रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र सकाळी-सकाळीच झालेल्या अपघातामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत.