Press "Enter" to skip to content

लिटल मिलेनियम खारघर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न !

लिटल मिलेनियम खारघर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न !

नवी मुंबई : खारघर सेक्टर 10 येथील लिटल मिलेनियम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार संजीव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भावना घाणेकर, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, पोलीस उप निरीक्षक अश्विनी राऊत, पनवेल मनपाचे माजी नगरसेवक नरेश ठाकूर, लिटल मिलेनियम शाळेच्या चेअरमन जराना राजपूत, संचालक संतोष राजपूत आदि मान्यवर उपस्थित होते.
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर करून आपली कला सादर केली. मान्यवरांनी मुलांचे कौतुक केले. लहान मुलांना एवढे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पाहुण्यांनी शाळेचे कौतुक करून शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोकण दर्पण