कामोठे येथे कर्करोग मार्गदर्शन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे लसीकरण शिबीर संपन्न
पनवेल : संपूर्ण जगभरात फेब्रुवारी हा महिना जागतिक कर्करोग जनजागृती महिना म्हणून राबवला जातो. याच अनुषंगाने रिनोवर हेल्थकेअर सोल्युशन, अपोलो हॉस्पिटल, कॅन्सर पेशंट ऐड असोसिएशन, हिरकणी फाऊंडेशन, कामोठे कॅालनी फोरम, रोटरी क्लब ॲाफ खारघर ऐक्झीकुटिव, निर्धार सामाजिक संस्था, नाना आग्रे फाऊंडेशन आणि श्री युवा मित्र मंडळ अशा विविध अन्य विविध संघटना यांच्यामार्फत मोफत कर्करोगावरील मार्गदर्शन, मोफत लसीकरण व ८०% ते ९०% सूट असलेल्या कर्करोग चाचण्या यांचे शिबिर आयोजित रविवार, दि. २६/२/२०२३ रोजी दत्तुशेठ विद्यालय, से-९, कामोठे येथे आयोजित केले होतें.
शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख श्री. रामदास शेवाळे आणि सिपिएए संघटनेच्या डॅा. धनंजया सरनाथ यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
याप्रसंगी उपस्थित २५० पेक्षा जास्त महिलांना प्रसिद्ध स्त्रिरोगतज्ञ डॅा. बिदु के. ऐस. आणि डॅा. उत्तम शिंदे यांनी कर्करोगवर मार्गदर्शन केले.
वय वर्ष 9 ते 20 या वयोगटातील
११० मुलींनी या शिबिराचा लाभ घेत लसीकरण केले.
यावेळी विशेष अतिथी म्हणुन माजी आमदार बळराम पाटील, एम्पावर संघटनेचे शहाजीराजे भोसले, दिशा संधटनेच्या निलम आंधळे, कफ संघटनेच्या रंजनाताई सडोलिकर आणि उषा डुकरे यांनी उपस्थिती लावली.
डॅा. सखाराम गारळे यांच्य पुढाकारातुन साकारलेल्य या अभिनव उपक्रमाला राहुल आग्रे, राहुल बुधे, निलेश आहेर, संतोष अलदर, जयवंत खारात, जयश्री झा, सुप्रिया माने, पुनम साकपाळ, रवी पाधी, सुजाता बत्तीन आणि संपुर्ण कामोठे कॅालनी फोरम टिमने संक्रिय सहभाग घेतला.





