श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
नांदेड, (प्रतिनिधी)-
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी जागृती सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव आनंद भोरगे सुप्रसिद्ध कलावंत बी. के. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रारंभी बहुजन प्रतिपालक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कार्याचा आढावा घेण्यात आला.
महाविद्यालयातील व्यवस्थापक विलास वाळकीकर, प्रा. विपिन कदम , प्रा. संजय नरवाडे , प्रा.अमोल धुळे , आदित्य कुंटे आदी उपस्थित होते.

श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ




