Press "Enter" to skip to content

कामोठे कॉलनी फोरम आणि अपोलो रुग्णालय, बेलापुर यांच्यातील सामंजस्य करार !

कामोठे कॉलनी फोरम आणि अपोलो रुग्णालय, बेलापुर यांच्यातील सामंजस्य करार!

पनवेल : कॅालनी फोरमच्या माध्यामातुन आपण अपोलो रुग्णालय, बेलापुर, नवी मुंबई सोबत सामंजस्य करारावर शनिवार, दि. २१/१/२०२३ रोजी स्वाक्षरी केली आहे. अपोलो रुग्णालय हे ३ वर्षांपूर्वी बेलापुर, नवी मुंबई येथे सुरु झालेले सुसज्ज असे रुग्णालय आहे.

या सामंजस्य करारांतर्गत कामोठे कॉलनी फोरमचे समन्वयक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच आपल्या रहिवाशांना IPD आणि OPD मध्ये सवलत ५% ते ३०% पर्यंत सवलत मिळेल.

विंशेष सुविधा
१. समन्वायकासाठी स्मार्ट हेल्थ कार्ड
२. विनामुल्य रुग्णवाहिका सेवा (कामोठे के अपोलो रुग्णालय)
३. विविध आरोग्य शिबिरे
४. तज्ञ डॅाक्टरांमार्फत चर्चासत्रे

यावेळी खालील सदस्य उपस्थित होते :
कामोठे कॅालनी फोरम प्रतिनिधी
१. डॅा. सखाराम गारळे आणि चमु
अपोल् रुग्णालय प्रतिनिधी
१. सरिता लॅारेन्स- प्रसिद्धी प्रमुख
२. प्रकाश वाडकर – मार्केटिंग मॅनेजर

कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने कामोठे येथील रहिवाशांसाठी हा एक उत्तम उपक्रम असेल, अशी प्रतिक्रिया कामोठे कॉलनी फोरमचे समन्वयक डॉ सखाराम गारळे यांनी यावेळी व्यक्त केली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »