बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या दक्षिण रायगड महिला जिल्हाप्रमुखपदी निलिमा घोसाळकर !
माणगाव, प्रतिनिधी :
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या रायगड जिल्हा महिला जिल्हाप्रमुख पद महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंन्त्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंन्त्री दादा भूसे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरतशेट गोगावले, दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी देण्यात आले.
निलिमा घोसाळकर यांच्याकडे याआगोदर शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुखपदी यशस्वी काम केले होते. स्वत:हा मांगरूळ ग्रामपंचायत सरपंच लोकप्रतिनिधी म्हणून देखील त्यांची कार्यकिर्द यशस्वी पार पडली. दक्षिण रायगड जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नांसाठी आपण काम करणार असून आमदार भरतशेट गोगावले यांनी केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून दक्षिण रायगडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विचार जिल्हाप्रमुख प्रमोदभाई घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्वच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवणार असल्याची प्रतिक्रिया शेवटी निलिमा घोसाळकर यांनी दिली.
निवडीच्या वेळीकॅबिनेट मंन्त्री दादा भूसे यांनी देखील निलिमा घोसाळकर यांना शुभेच्छा दिल्या यावेंळी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. मांगरूळ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच शितल योगेश वारीक व उपसरपंच प्रदिप घोसाळकर यांचा सत्कार देखील मुख्यमंन्त्री एकनाथ शिंदे यांनी केला.
यावेळी विभागप्रमुख रवी टेंबे, ग्रामपंचायत सदस्य संदेश पवार यांच्यासह रायगड जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





