कामोठे कॉलनी फोरम आणि शंकारा नेत्र रुग्णालय, पनवेल यांच्यातील सामंजस्य करार !
पनवेल : शंकरा रुग्णालय पनवेल आणि कामोठे कॉलनी फोरम यांच्यातील सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षरी करण्यात आली.
शंकरा नेत्र रुग्णालय हे नुकतेच सुरु झालेले ५ मजल्याचे सुसज्ज असे डोळ्याचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे.
या सामंजस्य करारांतर्गत कामोठे कॉलनी फोरमचे समन्वयक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच आपल्या रहिवाशांना IPD आणि OPD मध्ये सवलत ५% ते ५०% पर्यंत सवलत मिळेल.
यावेळी कामोठे कॅालनी फोरम डॅा. सखाराम गारळे, राहुल बुधे आणि
शंकरा नेत्र रुग्णालय डॅा. गिरीश बुधरानी- मुख्य वैद्यकिय अधिकारी, उर्मिला मुंगळे – प्रसिद्धी प्रमुख आदि उपस्थित होते.
मागिल ६ महिन्यांपासुन या रुग्णालया मार्फत संपुर्ण कामोठेकरांसाठी नेत्रतपासणी आणि तज्ञांमार्फत सल्ला अशा शिबीरांचा (२५ पेक्षा जास्त) तर ३०००हून अधिक नागरीकांना हि मोफत सेवा आपणं कामोठे कॉलनी फोरम मार्फत दिली. कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने कामोठे येथील रहिवाशांसाठी हा एक उत्तम उपक्रम असेल, अशी माहिती कामोठे कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक डॉ.सखाराम गारळे यांनी दिली.





