पत्रकार दिनानिमित्त 6 जानेवारी रोजी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन !
पनवेल : 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगर पत्रकार संघ, अपोलो हॉस्पिटल, बाळासाहेबांची शिवसेना आणि सत्याग्रह कॉलेज खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
आरोग्य शिबिराचे आयोजन खारघर सेक्टर 7 येथील सत्याग्रह कॉलेजच्या शांताबाई रामाराव सभागृहात सकाळी 8 ते 10 या वेळेत करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये इसीजी, ब्लड प्रेशर, ब्लड ग्लुकोज, नेत्र तपासणी, रक्त चाचणी तसेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध होणार आहे. नवी मुंबईतील सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी आपल्या कुटुंबियांसोबत उपस्थित राहून स्वतःची व कुटुंबियांच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





