राष्ट्रवादी पनवेल शहरजिल्हा महिला अध्यक्षपदी राजश्रीताई कदम !
पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खारघर येथील सक्रिय पदाधिकारी तथा खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्रीताई कदम यांच्या पक्षीय कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर पनवेल शहरजिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांनी राजश्रीताई कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहरजिल्हा महिला अध्यक्षपदी निवड केली आहे. राजश्रीताई यांना नुकतेच नियुक्तिपत्र देऊन जबाबदारी देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल शहरजिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळॆ, आजीनाथ सावंत, सुनीता पेटकर, विजया मोहिते, माधवी संगीताताई पवार, कोळी, कुंडलिक नेटके आदी पदाधिकारी उपस्थित होते.





