Press "Enter" to skip to content

मुरबी (खारघर) येथील स्मशानभूमीत शौचालय बांधावे : नगरसेविका नेत्रा पाटील !

मुरबी (खारघर) येथील स्मशानभूमीत शौचालय बांधावे : नगरसेविका नेत्रा पाटील !

पनवेल : खारघर शहरातील प्रभाग 4 मधील मुर्बी गाव सेक्टर 19 या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत शौचालयाची कुठलीही सोय नाही त्यामुळे सदर ठिकाणी बाहेर गावावरून अंत्यविधीसाठी येणाऱ्या पाहुणे मंडळींची अडचण होते. आज कालच्या धकाधकीच्या जीवनात मधुमेह (डायबिटीस) सारखा आजार असणाऱ्यांना तर ते अधिक अडचणीचे होते मुरबी गावातील व परिसरातील रहिवाशांनी माझ्याकडे सदर ठिकाणी शौचालय बांधावे अशी मागणी केलेली आहे. आपण सदर मागणीची त्वरित दखल घेऊन सदर ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी त्वरित शौचालय बांधावे, अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पनवेल मनपा प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »