Press "Enter" to skip to content

जानदार सोनखार स्पोर्ट्स फेस्टिव्हलची शानदार सांगता !

SONKHAR SPORTS FESTIVAL 2022

जानदार सोनखार स्पोर्ट्स फेस्टिव्हलची शानदार सांगता

नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मा.दशरथजी भगत व युवानेते निशांत भगत यांच्या वतीने सोनखार स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन आयोजित *सोनखार स्पोर्ट्स फेस्टिव्हल 2022चा* समारोप पारितोषिक वितरण समारंभ  विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणासह सानपाडा सेक्टर 16 येथील गुनीना मैदानात संपन्न झाला.

सानपाडा प्रभाग क्र.77 व 78 मधील सेक्टर 1, 13 ते 19 मधील नागरिकांकरिता सर्व वयोगटांतील विद्यार्थी व क्रीडाप्रेमी भाग घेता यावे म्हणून डिसेंबर महिन्यात प्रतिवर्षी सोनखार स्पोर्ट्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. 
यंदा देखील योगा व जिमनॅस्टिक, हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, मिनी मॅरेथॉन, स्केटिंग, सायकलिंग, कराओके (गायन), बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, नेमबाजी या क्रीडा प्रकारातील स्पर्धांसह 8 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेषतः जयपुरीयर स्कूल येथील मैदानात मिलीटरी ऍक्टिव्हिटीज सराव म्हणून ठेवण्यात आल्या होता. तसेच स्थानिक नगरसेविका वैजयंती भगत यांनी विभागातील महिला भगिनींना देखील स्वसंरक्षणासाठी *निर्भर बनो* या ट्रेनिंगपर कार्यक्रमाचे आयोजन २४ डिसेंबर रोजी करण्यात आले होते.

फेस्टिवलमध्ये आयोजित सर्व क्रीडा प्रकारांमध्ये सानपाडा पामबीच मधील सर्व सोसायट्यांमधील लहानांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत अश्या सगळ्यांनीच उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. यास्पर्धा प्रकारांमधील विजेत्यांना पारितोषिके देऊन मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.

पारितोषिक वितरण सोहळ्याला नगरसेविका फशीबाई करसन भगत, वैजयंती दशरथ भगत, रुपाली निशांत भगत यांसह प्रभागातील नागरिकांसह पामबीच- सोनखार जेष्ठ नागरिक सेवा समितीचे सर्व सदस्य, नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी, इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लबचे सदस्य, सर्व क्रीडा प्रकारांचे समन्वयक, सर्व सोसायटीतील अध्यक्ष, सचिव, खजिनदार व पदाधिकारी त्याचप्रमाणे उपस्थित खेळाडू आणि महिला पुरुष, तरुण-तरुणी यांच्या उपस्थितीत ख्रिसमस व नवीन वर्षाचे स्वागत बच्चेकंपनीनी केक कापुन केले व सोनखार स्पोर्ट्स फेस्टीवलचा समारोप करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन शैलेश घाग यांनी केले.
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »