वाशी रेल्वे स्टेशन पूर्वेकडे सिडको मार्फत प्रवासी व नागरिकांसाठी विविध पायाभूत सुविधांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न !
नवी मुंबई : वाशी रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील सानपाडा पामबीच वसाहतीतील १, १३ ते १९ अश्या एकूण नऊ सेक्टर्स मधील नागरिकांना वाशी रेल्वे स्टेशनहुन रेल्वेने प्रवास करताना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने याविरोधात काहीच महिन्यांपूर्वी माजी विरोधीपक्षनेते दशरथ भगत व स्थानिक नगरसेविका वैजयंती भगत यांनी सिडको भवना समोर सिडको प्रशासना विरोधात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणाला उपस्थित राहून आमदार गणेश नाईक यांनी पाठींबा देऊन येथील मागण्या मान्य होतील असे आश्वासित केले होते. सदर उपोषणाची आ. नाईक यांच्या आदेशाची आणि पाठपुराव्याची दखल सिडको प्रशासनाने घेऊन येथील पायाभूत सुविधांची कामे ज्यामध्ये डांबरी रस्ता, स्ट्रॉम ड्रेनेज लाईन (गटार) व पदपथ विकसित करणार आहेत, या विकास कामांचा भूमिपूज गुरुवारी सानपाडा सोनखार पामबीच विभागातील नागरिकांच्या उपस्थितीत माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत व नगरसेविका वैजयंती भगत करण्यात आले.





