Press "Enter" to skip to content

सूर्यकांत म्हसकर यांची शिवसेना कळंबोली शहरप्रमुखपदी नियुक्ती !

सूर्यकांत म्हसकर यांची शिवसेना
कळंबोली शहरप्रमुखपदी नियुक्ती !

पनवेल : शिवसेनेचे निष्ठावंत सूर्यकांत म्हसकर यांची शिवसेना कळंबोली शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी श्री म्हसकर यांना शुभेच्छा दिल्या.

सूर्यकांत म्हसकर हे मागील 35 वर्षांपासून सामाजिक सेवेत कार्यरत आहेत. शिवसेनेत सक्रिय होऊन श्री म्हसकर यांनी कळंबोली शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख,
उपशहर प्रमुख अशा पदांची जबाबदारी सांभाळेली आहे. शिवसेना पक्षाबाबतची निष्ठा आणि सामाजिक कार्यातील सातत्यामुळे सूर्यकांत म्हसकर यांच्यावर कळंबोली शहरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आगामी काळात होऊ घातलेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे लक्ष ठेवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली शहरात शिवसेना पक्षाची बांधणी करेन, अशी प्रतिक्रिया यावेळी सूर्यकांत म्हसकर यांनी यावेळी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »