Press "Enter" to skip to content

दारूमुक्त खारघरसाठी २७ नोव्हेंबर रोजी बंदची हाक !

दारूमुक्त खारघरसाठी २७ नोव्हेंबर रोजी बंदची हाक !

पनवेल : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या खारघर शहराने दारूमुक्त शहर म्ह्णून आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. यासाठी शहरातील सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी शासन -प्रशासनाशी लढा दिला. मात्र, पुन्हा एकदा खारघरच्या प्रतिमेवर डाग लावण्याचा प्रयत्न सुरु आला आहे. नागरिकांचा विरोध असताना खारघर सेक्टर १० , कोपरा गाव येथे निरसूख बारला मद्यविक्री करण्याचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे देण्यात आला आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी खारघर शहरातील नागरिकांनी पुन्हा एकदा लोक चळवळ गतिमान केली आहे. संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभे राहिले आहे. या आंदोलनाला खारघमधील सर्वपक्षीय मंडळींनी तसेच सामाजिक संघटनानी ताकद दिली आहे.
दारूमुक्त खारघरची लढाई यशस्वी करण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२२ रोजी खारघर बंदचे आवाहन संघर्ष समितीने केले आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »