Press "Enter" to skip to content

सेलिब्रेशन सोसायटी खारघर येथे मोफत हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन !

सेलिब्रेशन सोसायटी खारघर येथे मोफत हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन !

पनवेल : अपोलो हॉस्पिटल सीबीडी, मेडिकोर हॉस्पिटल खारघरमध्ये कार्यरत असलेले सिनिअर हार्ट सर्जन तसेच डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज मधील सिनिअर मेडिकल प्रोफेसर तथा खुशी हार्ट केअरचे वैद्यकीय संचालक जेष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ. केशव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खारघर येथील सेलिब्रेशन के एच 4 सोसायटीच्या पुढाकाराने मोफत ह्रदयरोग तपासणी शिबीर व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी डॉ केशव काळे हृदयाची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सेलिब्रेशन के एच 4 सोसायटी, सेक्टर 17, खारघर, नवी मुंबई येथे सदर शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले असून शिबिरामध्ये ईसीजी, बीपी, शुगर आदि चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. खारघर से 17 मधील सेलिब्रेशन सोसायटीसह से.18, 16, 15 परिसरातील सोसायट्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सेलिब्रेशन सोसायटीचे अध्यक्ष दौलत काटकर आणि सेक्रेटरी डॉ विजय चौव्हान यांनी केले आहे. शिबिराबाबत अधिक माहितीसाठी 9324888517 भ्रमण ध्वनिवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

*जेष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ. केशव काळे*

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »