एवढंच ना …ह्या मराठी चित्रपटाची नवी मुंबईत घोषणा
जागृती & गुरू एंटरटेंनमेंट निर्मित एवढंच ना …ह्या मराठी चित्रपटाची प पू श्री सद्गुरू दत्तानंद महाराज यांच्या हस्थे घोषणा व पोस्टर चे अनावरण NMSA वाशी नवी मुंबई येथे करण्यात आले या चित्रपटाचे निर्माते मुकुंद महाले , कैलाश गुरूड व सह निर्माता आप्पासाहेब रणदिवे ,दिग्दर्शक संतोष लोखंडे , छायांकन मिलिंद पवार , कार्यकारी निर्माता रंगराव घागरे हे काम पहात आहेत ह्या मराठी चित्रपटा मधे कलाकार प्रभाकर मोरे , कांचन पगारे , कमलाकर सातपुते , आनंदा कारेकर , रंगराव घागरे ,अनुष्का व नयन यांच्या मुख्य भूमिका आहेत.
तसेच या वेळी जागृती एंटरटेंनमेंट चे सर्वेसर्वा मुकुंदजी महाले यांचा जीवनपट दाखवण्यात आला व हिंदी चित्रपट गेम ऑफ लाईफ , सेकंड होम हिंदी वेबसीरिज जिंदा है माया चे पोस्टर व टिजर लॉन्च करण्यात आले याचे निर्माते मुकुंद महाले दिग्दर्शक एस प्यारेलाल आहेत या वेळी मराठी आणि हिंदी चित्रपटातील कलाकार व अनेक मान्यवर मंडळी हजर होते.






