बाळासाहेबांची शिवसेना पनवेल महानगर संघटकपदी मंगेश रानवडे तर खारघर शहर संघटकपदी इम्तियाज शेख !
पनवेल : बाळासाहेबांची शिवसेना पनवेल तालुक्यामध्ये टप्प्या-टप्प्याने वाढत आहे.
पक्षाचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी पक्ष संघटना बळकट करण्या-हेतूने, नवी पदनियुक्ती पत्रे प्रदान केले.
यात प्रामुख्याने, मागील सात वर्षापासून, खारघर मध्ये अनेक नागरी प्रश्न व मुद्धे सातत्याने उजागर व निवारण करणाऱ्या व्यक्तींमध्ये ओळख असलेल्या मंगेश सुधाकर रानवडे, यांना – महानगर संघटक (कार्यक्षेत्र -पनवेल), त्याच प्रमाणे, खारघर मध्ये कार्यशील आणि मन मिळावू स्वभावाचे, व मागील काळातील श्री उद्धव ठाकरे गटात उपशहर प्रमुख – खारघर असलेले श्री इम्तियाज शेख यांना शहर संघटक (कार्यक्षेत्र – खारघर ) पदनियुक्ती पत्र रामदास शेवाळे यांच्या हस्ते त्यांच्या बिमा कॉम्प्लेक्स च्या कार्यालयात देण्यात आले.
ह्या प्रसंगी श्री शेवाळे नवीन वाटचालीस, या दोघांनाही जवाबदारीने शुभेच्छा दिल्या.





