अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या *आपलं पॅपीलॉन* मासिकाचा *दिवाळी अंकाचे प्रकाशन* आज *भारत सरकारच्या विमुक्त आणि घुमंतू व अर्ध घुमंतू राष्ट्रिय आयोगाचे अध्यक्ष श्री दादा ईदाते* यांच्या हस्ते पार पडला यावेळी दापोली अर्बन बँक सायन्स कॉलेज चे *प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे*, जेष्ठ लेखक आणि *सल्लागार संपादक माधव गवाणकर* यांच्या सह दापोलीच्या नगराध्यक्षा *ममता मोरे* यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपलं पॅपीलॉन मासिकाची संपादकीय जबाबदारी सांभाळणारे *देवानंद भुवड* यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात पॅपीलॉन मासिकाला सर्वच क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचा मानस व्यक्त केला.
मासिकाचे *संपादक रमेश जोशी* यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करतानाच *पॅपीलॉन परिवाराची* चौफेर घोडदोड उपस्थितीतान् समोर मांडली... समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी *रोटी कपडा, मकान आणि आरोग्य सुविधा* हा चारसूत्री कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून *पॅपीलॉन उद्योग समूह* वाटचाल करत असून व्यवसायाची साखळी देशभरात उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ..
देशभरामध्ये विविध सामाजिक संस्था उभारणारे आणि भटक्या विमुक्त जमातीसाठी अविरत कार्यरत असणारे *जेष्ठ विचारवंत दादा ईदाते* यांनी *आपलं पॅपीलॉन* मासिक विषयी बोलताना हे मासिक समाजातील सर्व स्तरांसाठी काम करेल असे सांगत भूतकाळातील अनेक आठवणी ताज्या केल्या.
*प्राचार्य डॉ संदेश जगदाळे* यांनी मासिकाच्या शुभेच्छा देत कॉलेज मार्फत जी जी मदत आपल्याला लागेल ती आम्ही करू असे आश्वासन दिले.
दापोलीच्या प्रथम नागरिक ,*नगराध्यक्षा ममता मोरे* यांनी दर महिन्याला मासिकाची आम्ही चातकाप्रमाणे वाट पाहत असतो
असे सांगितले . आपलं पॅपीलॉन मासिकाचे सल्लागार संपादक आणि जेष्ठ लेखक माधव गवाणकर यांनीही अंक दर्जेदार तसेच सर्वांग सुंदर होण्यासाठी उत्तम लेखनाची जबाबदारी घेत केवळ वाशिळ्यावर लेखन न घेता जे उत्तम आहे तेच प्रसिद्ध करण्यात येईल हे सांगितले. गजलकार , कवी सुदेश मालवणकर यांनी प्रत्येक अंकामध्ये काहीतरी वेगळेपण असतेच असे नमूद करत वाचकांची वैचारिक भूक भागावन्याचे काम पॅपीलॉन मासिक नक्कीच करेल असा आशावाद व्यक्त केला, तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनीही पॅपीलॉन चा वाढता पसारा पाहता हा अंक अल्पावधीतच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचेल असा आशावाद व्यक्त करत पॅपीलॉन ला सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन त्यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमासाठी सप्ताहिक कोकण राजा संपादक चे संतोष शिर्के यांचेही समयोचित भाषण झाले कार्यक्रमा साठी कवी मंगेश मोरे,उडान सर्विसेस चे अनिष निमकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पत्रकार प्रशांत कांबळे यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते..
या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी अर्बन बँक सायन्स कॉलेज दापोली येथे करण्यात आले होते…… दर्दी वाचकांनी यासाठी मोठी हजेरी लावली होती.





