पनवेल(प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग कार्यालय ते जेएनपीटी पोर्ट तसेच द्रोणागिरी नोड – भेंडखळ बीपीसीएल प्रोजेक्ट सर्व्हिस रोड व मुख्य रस्ता येथे होत असलेल्या अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग ताबडतोब हटविण्यात यावी, अशी मागणी उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार महेश बालदी यांनी या निवेदनात म्हंटले आहे कि, कळंबोली ते उरण कडे जाणाऱ्या रस्त्यावरती डी पॉईंट राष्ट्रीय महामार्ग कार्यालय ते जेएनपीटी पोर्ट तसेच द्रोणागिरी नोडमधील सर्व्हिस रोड, भेंडखळ बीपीसीएल सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा अवजड वाहने अनधिकृत पार्किंग केल्या जातात. यामध्ये गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल यासारख्या ज्वलनशिल पदार्थाचा समावेश असतो. भेंडखळ गावानजीक बीपीसीएल कंपनी आहे. या कंपनीमधून गॅस सिलेंडरची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. कंपनीत वाहने पार्क करता येत नसल्यामुळे वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्क केली जात आहेत. परिणामी या गाडीवरचे ड्रायव्हर, क्लिनर या गाडीखाली स्टोव्ह पेटवून आपले जेवण शिजवतात. ज्वलनशिल पदार्थांच्या गाडीखाली स्टोव्ह पेटवल्याने स्फोट होण्याची दाट शक्यता आहे. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात आसपासच्या गावांना नुकसान होण्याची भिती आहे. अनेकदा या परिसरात अपघात होऊन अनेक दुचाकीस्वार जखमी व मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आणि त्यासाठी हे बेकायदेशीर अनधिकृत पार्किंग बंद करावे व रस्ते मोकळे करावेत, असेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग ताबडतोब हटवा : आमदार महेश बालदी !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ




