घरगुती गणपती सजावट स्पर्धा !
नगरसेवक रामजी बेरा यांचे आयोजन !
पनवेल : यंदाचा गणेशोत्सव आणखी समाजभीमुख व्हावा म्हणून पनवेल मनपाचे खारघर येथील नगरसेवक रामजीभाई बेरा यांनी पुढाकार घेतला आहे. रामजी बेरा यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. सदर स्पर्धा खारघर सेक्टर 3,4,5,6,7,12 आणि बेलपाडा विभागासाठी खासपणे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान खुली राहणार आहे. इच्छुकांनी आपल्या गणेश सजावटीचा फोटो 8169746530 या क्रमांकावर व्हाटसअँप करावा, अधिक माहितीसाठी 9930291814 क्रमांकावर संपर्क साधावा, मोठ्या संख्येने गणेश सजावट स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक रामजीभाई बेरा यांनी केले आहे.





