Press "Enter" to skip to content

महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव !

आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी

तुफानातले दिवे पुरस्कार जाहीर

महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव

मायाताई प्रतापसिंग बोदडे, धुरपताबाई भोरगे, केशरबाई गोटमुखे, सुभद्राबाई भालेराव, गोदावरीताई चिखलीकर, रमेशबाबू वाघमारे, मिलिंद दाभाडे, किशन बळीराम ठमके,
प्राचार्य अशोक जाधव, बी.डी. कांबळे प्रकाश येवले

आदींचा गौरव

नांदेड, (प्रतिनिधी) - येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात येत्या २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महाकवी जन्मशताब्दी महोत्सव घेण्यात येणार आहे. आंबेडकरी चळवळीत झोकून देणार्‍या कार्यकर्त्यांचा या जन्मशताब्दी महोत्सवामध्ये समितीतर्फे  ‘तुफानातले दिवे पुरस्कार’ देवून गौरव करण्यात येणार आहे. 
या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये मायाताई प्रतापसिंग बोदडे, धुरपताबाई भोरगे, केशरबाई गोटमुखे, सुभद्राबाई भालेराव, गोदावरीताई सत्यजित चिखलीकर, रमेशबाबू वाघमारे, मिलिंद दाभाडे, किशन बळीराम ठमके, प्राचार्य अशोक जाधव, बी.डी. कांबळे  आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे सेवानिवृत्त उपायुक्त प्रकाश येवले यांचा समावेश आहे. महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीचे मुख्य संयोजक संजय निवडंगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »