दि.बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामांतर ! आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार !
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रस्तावांना मंजुरी दिली, त्यामध्ये नवी मुंबई विमानतळचं नामांतर दि.बा. पाटील करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.





