शिवबंधन प्रतिष्ठान संस्थेची नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड !
पनवेल : शिवबंधन प्रतिष्ठान संस्थेची नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड नुकतीच करण्यात आली. खारघर येथे संपन्न झालेल्या बैठकीत सदर निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून साधना पवार, सचिव प्रभाकर बांगर, खजिनदार निलेश देशमुख, उपाध्यक्ष कुणाल संघानी, उपाध्यक्ष अनिल साबणे, उपाध्यक्ष वैशाली देसाई, सहसचिव लखवीर सिंग सैनी, तसेच सदस्य म्हणून जगबंध साहू, प्रिया दळवी, आशा शेडगे, अश्विनी भुवड, सुरेखा बांगर आदिंचा समावेश आहे.
खारघरमधील विविध समाजिक व सार्वजनिक उपक्रमांवर काम करणार असल्याचा संकल्प यावेळी नवीन कार्यकारिणीने व्यक्त केला.





