युवाप्रेरणा सामाजिक संस्था व माहेश्वरी प्रगती मंडळ ,खारघर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी सलग बारावे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात 81 रक्तदात्यांनी रक्तदान करत आपला सहभाग नोंदवला. तसेच परिसरातील नागरिकांसाठी साईदृष्टी ॲडव्हान्स सेंटर फॉर परफेक्ट व्हिजन, सानपाडा या हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर नेत्र चिकित्सा शिबिरात डॉक्टर राजपाल उसनाळे यांनी अनेक नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी केली व डोळ्या संबंधित आजारांबद्दल मार्गदर्शन केले. सदर शिबिराला भेट देण्यासाठी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब यांच्या हस्ते रक्तदात्यांना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब व आयुक्त गणेश देशमुख साहेब यांनी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या शिबिरास व सामाजिक कार्याबद्दल त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळेस युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील, दिलीप जाधव, भरत कोंढाळकर, कुणाल देवकर, गोपाल राजपूत, संदीप ठाकरे, ललित बडोदेकर,आदित्य हाटगे
माहेश्वरी प्रगती मंडळ खारघरचे
जय डागा, आशीष मनीयार, सतीशजी मुंदड़ा, मंगेशजी सिकची ,अमित भांगड़े , सचिन सोनी, आशीष शारदा, डॉ राकेश सोमानी, गीतेष कोठारी
सोमन मालाणी यांसह इतर पदाधिकारी यांनी आयोजनासाठी मेहनत घेतली.

कॅन्सर रुग्णांसाठी महारक्तदान शिबीर ! ८१ रक्तदात्यांनी केले रक्तदान !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ




