Press "Enter" to skip to content

‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेसाठी पनवेल महापालिका 1 लाख 25 हजार झेंडे खरेदी करणार !

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घ्यावा: आयुक्त गणेश देशमुख
‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेसाठी पनवेल महापालिका 1 लाख 25 हजार झेंडे खरेदी करणार !

पनवेल: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ‘घरोघरी तिरंगा’ मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने जोरदार तयारी करत आहे. या मोहिमेसाठी महापालिका १ लाख २५ हजार ध्वज खरेदी करणार आहे. नागरिकांना आपापल्या घरांवर ध्वज लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने मुख्यालयामध्ये आणि प्रभाग कार्यालयांतून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमात नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी केले आहे.
केंद्र शासनाने यावर्षी देशभरात ‘घरोघरी तिरंगा’ मोहीम राबविण्याचे ठरवले आहे. त्यानुसार महापालिकेने शहरात ही मोहीम राबविण्याचे काम हाती घेतले आहे. मनपा आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी ध्वज संहिता आणि सर्व नियम पाळून आदरपूर्वक नागरिकांनी हे ध्वज लावावेत, असे आवाहन केले आहे. आजवर राष्ट्रध्वज ही एक मर्यादित संकल्पना होती. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाला आपले मानावे, त्याप्रति त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, नागरिकांमध्ये देशाबद्दल आदर वाढावा, एकोप्याची भावना निर्माण व्हावी या हेतूने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिलेल्या माहितीनूसार घरोघरी ध्वज लावण्यासाठी महापालिकेने 1 लाख25 हजार ध्वज खरेदी केले आहेत. ही खरेदी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडुन करण्यात आली आह काही संस्था, संघटना हे ध्वज खरेदी करून नागरिकांना भेट देऊ शकतात. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर 13 ऑगस्ट ते 15ऑगस्ट या कालावधीत नागरिकांना आपल्या घरांवर तिरंगा फडकवायचा आहे. नागरिकांनी घराच्या दर्शनी भागात हे झेंडे लावावे . या उपक्रमांतर्गत पालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी, शासकीय, निमशासकीय आस्थापना, शाळा, महाविद्यालये, सहकारी संस्था,खाजगी आस्थापना यांनी पुढाकार घेऊन झेंडा फडकवायचा आहे.
चौकट
या मोहिमेसाठी महापालिकेचे अधिकारी स्वयंप्रेरणेने काही ध्वज देणार आहेत. यांमध्ये महापालिका आयुक्त श्री गणेश देशमुख यांनी स्वतः 500 झेंडे दिले आहेत. तसेच अधिकारी आणि कर्मचारी 10 हजार झेंडे देणार आहेत. या मोहिमेसाठी एकुण 2 लाख 94 हजाराचे झेंडे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
झेंडा तयार करण्याबाबतचे निर्देश
झेंड्याचा आकार आयताकार असावा, तिरंगा झेंड्याची लांबी व रुंदी प्रमाण हे ३:२ असे असावे, तिरंगा बनविण्यासाठी खादी अथवा कॉटन, पॉलीस्टर, सिल्क कापड यापासून बनविला जावू शकतो, झेंड्याच्या रंगाचा क्रम नियमाप्रमाणे, सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग व मध्यभागातील पांढऱ्या पट्टीवर २४ रेषांचे गोलाकार निळ्या रंगाचे अशोकचक्र आवश्यक.
चौकट
*झेंडा फडकविण्याबाबतचे नियम *
प्रत्येक नागरिकांनी तिरंगा झेंडा सहिंतेचे पालन करावे, तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा. दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत “घरोघरी झेंडा” उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधी नंतर नागरिकांनी सन्मानाने सुरक्षित ठेवावे, अभियान कालावधी नंतर झेंडा फेकला जावू नये, तो सन्मानाने जतन करून ठेवावा, झेंडा अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेल्या परिस्थितीत झेंडा लावला जावू नये, नागरिकांनी तिरंगा ध्वजासोबतचा फोटो (सेल्फी) पनवेल मनपाच्या फेसबुक अकाउंटला टॅग करावा.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »