खारघर एम्पायर एस्टेट व हावरे स्प्लेंडर सोसाइटीतील शेकडो नागरिकांनी घेतला कोविड बुस्टर डोस शिबिराचा लाभ
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या पुढाकाराने आणि नगरसेवक रामजीभाई बेरा यांच्या सहकार्याने खारघर सेक्टर 20 मधील एम्पायर इस्टेट व हावरे स्प्लेनडर सोसायटीत आयोजित केलेल्या कोविड बुस्टर डोस शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
केंद्र सरकारकडून कोविड लस अमृतमहोत्सव अंतर्गत मोफत बूस्टर डोसचे लसीकरण पनवेल महानगरपालिकेच्या वतीने व भाजपा खारघर मंडल अध्यक्ष श्री ब्रिजेश पटेल यांच्या पुढाकाराने दिनांक ३१/७/२०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यत एम्पायर एस्टेट सोसायटी व हावरे स्प्लेंडर मध्ये सेक्टर 20 रहिवाशांसाठी विशेष बूस्टर डोस तसेच ज्या नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला नाही त्यांच्यासाठी हि डोस उपलब्ध करण्यात आले होते , तरी या शिबिरांमध्ये एकूण 400 पेक्षा जास्त सुज्ञ नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला . या शिबिराला माजी नगरसेवक श्री रामजीभाई बेरा, माजी नगरसेवक श्री प्रवीण पाटिल, माजी नगरसेवक श्री नेत्रा पाटिल, किरण पाटिल, आंबाभाई पटेल, गिरीश गुप्ता, शीलेन्द्र त्रिपाठी उपस्थित राहिले





