Press "Enter" to skip to content

सर्बानंद सोनोवाल केंद्रीय मंत्री, आयुष मंत्रालय यांच्या हस्ते नवी मुंबईत आयुष बिल्डिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन !

श्री सर्बानंद सोनोवाल, माननीय केंद्रीय मंत्री, आयुष मंत्रालय
यांच्या हस्ते नवी मुंबईत आयुष बिल्डिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन

होमिओपॅथीसाठी प्रादेशिक संशोधन संस्था (आरआरआयएच) आणि युनानी औषधींसाठी प्रादेशिक संशोधन संस्था (आरआरआययूएम) यांच्या साठी तीन मजली इमारत संकुल
आरआरआयएच आणि आरआरआययूएम ला अनुक्रमे ऍलर्जीक डिसऑर्डर आणि रेजिमेंटल थेरपीसाठी उत्कृष्ट केंद्र बनवण्याची पावले

नवी मुंबई, ३० जुलै, २०२२: श्री सर्बानंद सोनोवाल, माननीय केंद्रीय मंत्री – आयुष्य आणि बंदरे, पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्रालय, यांनी आज नवी मुंबईतील खारघर येथे आयुष संकुलाच्या इमारतीचे उद्घाटन केले. या नवीन इमारतीमध्ये आरआरआयएच आणि आरआरआययूएम ह्या दोन्ही संस्था स्थित असतील. या वास्तूची पायाभरणी २८ डिसेंबर २०१५ रोजी करण्यात आली. सिडकोने ही तीन मजली संकुल इमारत ५८६० चौरस मीटरच्या बांधकाम क्षेत्रासह १९९९.८२ चौरस मीटरच्या भूखंडावर बांधली आहे.

श्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय आयुष मंत्री यावेळी बोलताना म्हणाले, “भारतीय पारंपारिक औषधी पद्धती अनेक शतकांपासून मानवी जीवनाच्या समृद्धीवर त्यांचा प्रभाव सिद्ध करत आहेत. आधुनिक वैद्यकशास्त्रासोबतच औषधाच्या या शाखेचे फायदे समाविष्ट करण्याची कल्पना आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पुढे आणली होती. या दोन संस्था – होमिओपॅथीसाठी प्रादेशिक संशोधन संस्था (आरआरआयएच) आणि युनानी औषधींसाठी प्रादेशिक संशोधन संस्था (आरआरआययूएम) यांना अनुक्रमे ऍलर्जिक डिसऑर्डर आणि रेजिमेंटल थेरपीसाठी उत्कृष्ट केंद्र बनवण्याचा आमचा मानस आहे. आयुष मंत्रालयाच्या आदेशानुसार या दिशेने कामास आधीच सुरुवात झाली आहे.”

या संस्था बालरोग, वृद्ध आणि सामान्य लोकांसाठी रुटीन हेमॅटोलॉजिकल आणि बायोकेमिस्ट्रीसाठी रूग्ण सल्ला, औषधे आणि प्रयोगशाळेची सुविधा प्रदान करतील आणि अनुक्रमे होमिओपॅथी आणि युनानीचे स्वतंत्र प्रभारी यांच्या नेतृत्वाखालील आहेत. आरआरआयएच आणि आरआरआययूएम लवकरच ऍलर्जीक विकारांसाठी होमिओपॅथी संस्था म्हणून आणि इलाज-बिट-तदबीर म्हणजेच रेजिमेंटल थेरपीचे उत्कृष्ट केंद्र म्हणून विकसित केले जातील असा प्रस्ताव आहे.

पारंपारिक भारतीय औषधी पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला पुढे जोडून, श्री सर्बानंद सोनोवाल पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदीजींच्या पारंपरिक भारतीय औषध पद्धतीला बळकटी देण्याच्या दृष्टीकोनानुसार, चांगल्या रूग्ण सेवेसाठी आपल्या स्वतःच्या पारंपारिक औषधी पद्धतींचा प्रचार आणि वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालय पावले उचलत आहे. आज, या पायाभूत सुविधांच्या उद्घाटनासह, आम्ही या उद्दिष्टाच्या आणखी एक पाऊल पुढे जात आहोत. या संकुलाच्या उद्घाटनाने महाराष्ट्रात आयुष औषधी पद्धतीला चांगलाच वेग आला आहे. मला आशा आहे की या दोन संस्थांमधून होणाऱ्या कामाचा लाभ मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना मिळेल.”

या कार्यक्रमाला पनवेलचे स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर, डॉ. संगीता ए दुग्गल, सल्लागार, होमिओपॅथी, आयुष मंत्रालय; डॉ अनिल खुराना, अध्यक्ष, राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग; आणि डॉ राज के मनचंदा, आयुषचे संचालक, दिल्ली सरकार उपस्थित होते.

डॉ. सुभाष कौशिक, महासंचालक, सीसीआरएच आणि डॉ. असीम अली खान, महासंचालक, सीसीआरयूएम हे मुख्य आयोजक होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. रमेश बावस्कर, प्रभारी अधिकारी, आरआरआयएच, नवी मुंबई आणि डॉ. निर्मला देवी, प्रभारी अधिकारी, आरआरआययूएम, नवी मुंबई यांनी केले. उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या प्रतिनिधींमध्ये होमिओपॅथिक आणि युनानी संशोधक, शास्त्रज्ञ, आयुष प्रणाली आणि आधुनिक औषधांचे वरिष्ठ चिकित्सक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थी आणि रुग्ण होते. समारोहासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय आणि स्थानिक अधिकार्‍यांसह या संस्थांना प्रामाणिक सेवा देणारे माजी कर्मचारी देखील उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »