Press "Enter" to skip to content

खारघर येथील ओपन जिमचे साहित्य गायब झाल्याची शिवसेनेची खारघर पोलिसांकडे तक्रार !

खारघर येथील ओपन जिमचे साहित्य गायब झाल्याची शिवसेनेची खारघर पोलिसांकडे तक्रार !

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून खारघर मधील सेलिब्रेशन सोसायटी सेक्टर 16 जवळील परिसरात लावण्यात आलेल्या ओपन जिमचे साहित्य गायब झाल्याची लेखी तक्रार खारघर शिवसेनेच्या वतीने खारघर पोलिसांकडे करण्यात आली आहे. सदर प्रकरणी तक्रारीचे लेखी निवेदन शिवसेना खारघर उपशहरप्रमुख नंदू वारुंगसे यांनी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून काही महिन्यांपूर्वी खारघर सेक्टर 16 येथे ओपन जिम व हायमास्ट लावण्यात आले होते. मात्र, 24 जुलै रोजी सायंकाळी वॉकिंगसाठी जात असताना सदर ठिकाणी लावण्यात आणलेले ओपन जिमचे साहित्य निदर्शनास आले नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी पाहणी केली असता ज्या ठिकाणी जिमचे साहित्य लावण्यात आले होते, तिथे फक्त नटबोल्टचे फाउंडेशन असल्याचे निदर्शनात आल्याने मी 100 क्रमांकावर पोलिसांना फोन केल्याचे नंदू वारुंगसे यांनी निवेदनात म्हटले आहे. या दरम्यान , खारघर पोलीस ठाण्यातून कॉल करून मला बोलवून घेतल्यानंतर मी याबाबत माहिती दिल्यानंतर खारघर पोलिसांनी ओपन जिमचे जागेची पाहणी केली. सदर प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खारघर उपशहरप्रमुख नंदू वारुंगसे यांनी खारघर पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जनतेचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जाण्याला जबाबदार कोण ? असा सवाल नंदू वारुंगसे यांनी केला आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »