शेतकरी राजा हरपला ! राजाराम घरत यांचे दुःखद निधन !
माजी उपसरपंच संजय घरत, जगदीश घरत यांना पितृशोक !
पनवेल : पनवेल तालुक्यातील बेलपाडा गावचे भूमिपुत्र, शेतकरी राजा, शेतकऱ्यांचे कनवाळू, जेष्ठ भजन गायक राजाराम लक्षण घरत यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय 82 वर्षे होते.
स्व. राजाराम घरत हे खारघर येथील माजी उपसरपंच तथा भाजपचे खारघर शहर उपाध्यक्ष संजय घरत आणि शेकापचे खारघर येथील नेते जगदीश घरत यांचे वडील होय.
ह.भ.प. स्वर्गीय श्री राजाराम लक्ष्मन घरत यांचा जन्म : 15/07/1941 रोजी झाला तर मृत्यू 26/07/2022 रोजी झाला. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती यमुनाबाई राजाराम घरत, पत्नी , मुलगी सौ जयश्री विजय चिखलेकर, मुलगा श्री हरीचंद्र राजाराम घरत, मुलगा श्री जगदीश राजाराम घरत, मुलगा श्री संजय राजाराम घरत, जावई श्री विजय अनंत चिखलेकर, श्री ज्ञानेश्वर अनंत चिखलेकर, भाचा श्री नंदकुमार नामदेव पाटील, भाचा
श्री नितीन रामचंद्र पाटील, भाचा
कु. दर्शन विजय चिखलेकर, नातू असा मोठा परिवार आहे.
कोकण दर्पण !कोकण LIVE





