जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील यांना पितृशोक !
पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे खारघर येथील जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू धर्मा पाटील यांचे वडील धर्मा सुदाम पाटील यांचे 17 जुलै रोजी मुर्बी गाव सेक्टर 19, खारघर येथे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 93 वर्ष होते.
त्यांच्या पश्चात पत्नी मनुबाई धर्मा पाटील, मुले अभिमन्यू धर्मा पाटील, संजय धर्मा पाटील, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
दशक्रिया विधी श्री क्षेत्र नाशिक येथे मंगळवार 26 जुलै रोजी होणार असून उतरकार्य विधी 29 जुलै रोजी मुर्बी गाव, खारघर सेक्टर 19 येथील राहत्या घरी होणार आहे.





