रेजीन्सी क्रिस्ट, केसर गार्डन, जलवायू विहार सोसायटीतील शेकडो नागरिकांनी घेतला कोविड बुस्टर डोस ! नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांचा पुढाकार !
पनवेल : खारघर येथील रेजीन्सी क्रिस्ट, केसर गार्डन, जलवायू विहार सोसायटीतील शेकडो नागरिकांनी कोविड बुस्टर डोस घेतला. पनवेल मनपातील भाजपच्या माजी नगरसेविका नेत्रा किरण यांच्या पुढाकाराने शनिवार व रविवारी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत कोविड बुस्टर डोस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोविड व्हॅक्सीनेशन अमृत महोत्सव अंतर्गत सदर शिबिराचे आयोजन केल्याची माहिती नगरसेविका नेत्रा पाटील यांनी दिली दिली. खारघर येथील समाजसेवक किरण पाटील यांनी सदर शिबीर आयोजनात विशेष योगदान दिले.





