Press "Enter" to skip to content

खारघर से. 16 वास्तुविहार परिसरात स्वच्छता मोहीम ! NCP युवती अध्यक्षा रेणुका पगारे यांचा पुढाकार !

खारघर से. 16 वास्तुविहार परिसरात स्वच्छता मोहीम ! NCP युवती अध्यक्षा रेणुका पगारे यांचा पुढाकार !

पनवेल : पनवेल मनपा क्षेत्रातील खारघर सेक्टर 16 मधील वास्तुविहार सोसायटी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पनवेल महानगरपालिका स्वच्छता दूतांच्या सहयोगाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस खारघर शहर युवती अध्यक्षा रेणुका पगारे यांच्या पुढाकाराने सदर मोहीम राबिविण्यात आली.
वास्तुविहार परिसरातील आणि विशेषतः केपीसी शाळेसमोरील रस्त्याकडेला पावसामुळे गवत वाढले होते. पदपथावरून जाणारे नागरिक ,महिला, जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना चालताना त्रासदायक ठरत होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी युवती अध्यक्षा रेणुका पगारे यांच्याकडे वारंवार तक्रार केल्यानंतर त्यांनी पनवेल मनपा प्रशासनाला कळविले. दरम्यान, आज पनवेल मनपाच्या माध्यमातून रस्त्यावर वाढलेले गवत काढून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पनवेल मनपाच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन्स देखील सफाई करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी खारघर अध्यक्ष बळीराम नेटके,मनिष कुळे ,नितिन म्हात्रे ,सत्यवती रुईकर – उत्सव सोसायटी मॅनेजर, पनवेल मनपा SI अजय ठाकुर, पदाधिकारी तसेच रहिवाशी उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »