नांदेड, (प्रतिनिधी) येथील श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाचा रविवार, दिनांक १० जुलै रोजी पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पूर्णा रोडवरील नागोरावजी नरवाडे मंगल कार्यालयात सकाळी ११.३० वाजता हा सोहळा होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे यांच्या हस्ते पदवी वितरण समारंभ पार पडणार आहे. महाविद्यालयाचे संस्थापक- अध्यक्ष तथा प्रभारी प्राचार्य डॉ. विकास लिं. कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, जागृती सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव आनंद रा. भोरगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाच्या बी. ए. (एम. सी. जे.), बी. जे. एम. एस. आणि एम. जे. एम. एस. या अभ्यासक्रमाच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांना यावेळी पदवी वितरण करण्यात येईल. महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक विलास वाळकीकर, प्रा. अमोल धुळे, प्रा. विपिन कदम, प्रा. संजय नरवाडे, प्रा. शुद्धोधन एडके, प्रा. जगदीश केंद्रे, प्रा. अशोक डोंगरे, सौ. शारदा कुलकर्णी, रोहित माळी, बालाजी कुलकर्णी आदींनी या सोहळ्यासाठी पुढाकार घेतला आहे.

श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाचा १० जुलै रोजी पदवी वितरण समारंभ !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




