पनवेल : आगामी काळात होणाऱ्या पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत कॉलनी फोरम स्वतंत्र लढणार असून महापालिका निवडणूक रिंगणात तब्बल 61 उमेदवार उतरविणार असल्याची घोषणा कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांनी आज खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी कॉलनी फोरमचे समन्वयक मधू पाटील, ऍड बालेश भोजणे, अनिता पाटील, कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश आढाव, कॉलनी फोरमचे नेते डॉ एस एल गराळे, ऍड. समाधान् काशीद तसेंच कॉलनी फोरमचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पनवेल महापालिकेतील् सत्ताधारी भाजप पनवेलकरांना नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरले असून नागरिकांची फक्त दिशाभूल केल्याचा टोला यावेळी लीना गरड यांनी लागावला. यावेळी ऍड बालेश भोजणे, मधू पाटील, मंगेश आढाव, ऍड.समाधान काशीद यांनी कॉलनी फोरमची भूमिका मांडली. पनवेलचा पाणी प्रश्न, मालमत्ताकर, शिक्षण, आरोग्य, आदी प्रमुख प्रश्नणावर कॉलनी फोरम आगामी काळात प्रभाविपणे काम करणार असल्याचे लीना गरड यांनी नमूद केले.
आगामी पनवेल मनपा निवडणुकीसाठी कॉलनी फोरम सज्ज ! 61 उमेदवार उतरविणार निवडणुकीच्या रिंगणात !