Press "Enter" to skip to content

भाजपच्या वतीने विधवा महिलांचा सन्मान ! नगरसेवक निलेश बाविस्कर यांचे आयोजन !

पनवेल : चला मोडीत काढू विधवा महिला परंपरा,देऊ सन्मान प्रत्येक महिलेला हे ब्रीद घेऊन भाजप खारघर शहराच्या वतीने खारघर येथे विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला. नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पुढाकाराने खारघर घरकूल- स्पेगेटी सोसायटी जवळील पंचशील बुद्धविहार येथे आयोजित केलेल्या विधवा महिला सन्मान सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र स्वागत व कौतुक करण्यात आले.

समाजातील विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे, कोणत्याही संकटात त्यांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे, त्यांच्यातील मनोबल वाढवावे, त्यांनी ताट मानेने समाजात वावरावे, या सामाजिक उद्देशातून कार्यक्रम आयोजित केल्याची प्रतिक्रिया नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.

यावेळी उपस्थित कांचन बिर्ला ,कनकलता सिंग ,प्रतिक्षा माळी
विमल कांबळे ,छाया हरेल ,गोदावरी कातारे ,शकुंतला नेगी ,कौशल्या साळवी आदी महिलांनी आपले।मनोगत व्यक्त केले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »