Press "Enter" to skip to content

अटल फाउंडेशन, खारघर भाजपाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पनवेल : रविवार दिनांक १२जून २०२२ रोजी खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे भारतीय जनता पार्टी खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांचा वाढदिवस व जागतिक रक्तदान दिवसानिमित्त रक्तदान व मोफत शरीर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

अटल फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ खारघर एक्झिक्युटिव्ह, रुधिर सेतू संस्था, एमजीएम हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल व खारघर भाजपा यांच्या सहकार्याने ९२ जणांनी रक्तदान केले तसेच अनेक नागरिकांच्या मोफत तपासण्या झाल्या.

राष्ट्रीय हित जोपासत सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने जास्तीतजास्त जणांनी रक्तदान करण्याचे आवाहन अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केले होते त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ब्रिजेश पटेल म्हणाले की, रक्तदान ही काळाची गरज आहे. एका रक्तदात्यामुळे आपण तिघांचे प्राण वाचवू शकतो ही कल्पनाच अतिशय सुखावह ठरते.

या शिबिराला लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील,नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, रामजीभाई बेरा, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, माधुरी श्रीनिवास कोडूरु, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, मोना अडवाणी, बिना गोगरी, संध्या शारबिद्रे, साधना पवार, शोभा मिश्रा, अंजुबेन पटेल, निर्मला यादव, प्रिया दळवी, सुनंदा देसाई, विजया लक्ष्मी सरकार, वासुदेव पाटील, समीर कदम, संदीप रेड्डी, किरण पाटील, प्रभाकर बांगर, विलास आळेकर, गिरीश गुप्ता, राजेंद्र मांजरेकर, सूर्या दुडम, शुभ पाटील, नवनीत मारू, संतोष शर्मा, मुकेश गर्ग, सुमित सहाय, योगेंद्र कोत्यारि, रोहन शेट्टी, कृष्णा खडगी, अशोक जांगीड, विजय बागडे इत्यादी उपस्थित होते.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ब्रिजेश पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ज्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले शिवाय अनामिका चप्पल आणि काजल कांबळे या मिसेस खारघर विजेत्या दोघीनीसुद्धा या शिबिराला सदिच्छा भेट दिली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »